शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 01:48 IST

मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात.

शिर्डी : शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशिया व वर्ल्ड शिर्डी साईबाबा संस्था लंडन या संस्थेद्वारे मलेशिया, लंडन व मॉरिशस येथून आलेल्या ४९ साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे बुधवारी दर्शन घेतले़ संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला.मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात. संपूर्ण मलेशियात १०० हून अधिक साईबाबांची प्रार्थना स्थळे, तर २२ साईमंदिरे आहेत. यामध्ये क्वालालंपूर, जोहर बहरु, पेनांग येथील साईमंदिरे सर्वात मोठी असून तेथे शिर्डी साईमंदिराप्रमाणे चारही वेळच्या आरत्या, प्रसाद भोजनही दिले जाते. मलेशिया सरकारने बोटॅनिक क्लँग येथे अर्धा एकर जागा साईबाबा मंदिराकरीता देऊ केलेली आहे. मलेशियातील ईपोह येथील डोंगरावर १० एकर जागेवर सार्इंची भव्य मूर्ती उभारणार असल्याचेही कन्नन यांनी सांगितले.श्री. साईबाबा समाधी मंदिरात शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशिया व वर्ल्ड शिर्डी साईबाबा संस्था लंडन यांनी साई सरस्वती संगीत विद्यालय, शिर्डी यांच्या सहकार्याने भजनसंध्या कार्यक्रम केला.

टॅग्स :shirdiशिर्डी