विजेअभावी मक्तापूरचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:11+5:302021-06-20T04:16:11+5:30
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील ग्रामपंचायतीचे वीज बिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीचे वीज जोड तोडला आहे. त्यामुळे ...

विजेअभावी मक्तापूरचा पाणीपुरवठा बंद
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील ग्रामपंचायतीचे वीज बिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीचे वीज जोड तोडला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे बंद असून गाव अंधारात बुडाले आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिकाही विजेअभावी बंद असल्याने पाणीपुरवठा बंद असून महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या समस्या न सुटल्यास मक्तापूर ग्रामपंचायतीवर महिलांसमवेत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मक्तापूर ग्रामपंचायतीचे साडेचार लाख रुपये वीज बिल थकीत आहे. २०१९ साली ग्रामपंचायतीने अल्पशी रक्कम वीज बिलापोटी भरली होती. त्यानंतर आजतागायत वीज बिल भरणा न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. यासंदर्भात विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही ही रक्कम भरली गेली नाही.
190621\img-20210619-wa0012.jpg
नेवासा फाटा: नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावातील सर्व पथदिवे गेली दोन दिवसांपासून बंद असून गावातील ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिका देखील विजेअभावी बंद असल्याने ग्रामपंचायतला निवेदन देतांना शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे आदी...