कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथे मेकअप कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 23:59 IST2016-05-13T23:57:52+5:302016-05-13T23:59:39+5:30

कोपरगाव/ मिरजगाव/ श्रीगोंदा : कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथील सखी मंच सभासदांसाठी मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Makeup Workshop at Kopargaon, Mirajgaon, Shrigonda | कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथे मेकअप कार्यशाळा

कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथे मेकअप कार्यशाळा

कोपरगाव/ मिरजगाव/ श्रीगोंदा : कोपरगाव, मिरजगाव, श्रीगोंदा येथील सखी मंच सभासदांसाठी मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच आपले व्यक्तिमत्व चांगले दिसण्यासाठी मेकअप कसा करावा, याच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सखींना मिळणार आहे. यावेळी पर्सनल जनरल मेकअप, आॅफिशियल मेकअप, पार्टी मेकअप या विषयांवर चर्चा आणि प्रात्यक्षिकाद्वारे सखी सदस्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येताना सखींनी ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाद्वारे सखींना केव्हाही, कुठेही, कधीही सुंदर राहण्यासाठी कला अवगत करता येणार आहे.
कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील स्पार्कल मेकअप स्टुडिओच्या संचालिका सिनेमेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे या सखींना स्वत:चा मेकअप स्वत: कसा करावा, उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे, केसांची निगा कशी राखावी, डोळ्यांचीही उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, यावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सखींनी ९८५०२६४२०० व ९८५०३०२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Makeup Workshop at Kopargaon, Mirajgaon, Shrigonda