शंभर परसबागा उभ्या राहण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:17+5:302021-07-11T04:16:17+5:30
बाभळेश्वर (ता.राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्यावतीने नक्षत्र पोषण परसबागेतच्या शुभारंभप्रसंगी ...

शंभर परसबागा उभ्या राहण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत
बाभळेश्वर (ता.राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्यावतीने नक्षत्र पोषण परसबागेतच्या शुभारंभप्रसंगी विखे बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, माजी उपसभापती बबलू म्हस्के, पंचायत समितीचे सदस्य संतोष ब्राह्मणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका रूपाली लोंढे, गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख अनुराधा वांढेकर, पंचायत समितीचे प्रमोद पांडे बाभळेश्वरच्या उपसरपंच अमृत मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अर्थात उमेद अंतर्गत ही नक्षत्र परसबाग आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. गावपातळीवर समूह प्रेरिकांनी यांची माहिती जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सौ. विखे पाटील यांनी सांगून या माध्यमातून महिलांमध्ये विषमुक्त भाजीपाला ही संकल्पना राबवून सेंद्रिय परस बागेला प्रोत्साहन द्यावे. बचत गटाद्वारे ही संकल्पना राबविताना प्रत्येक गावात परसबागेचे निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी पंचायत समितीचे परसबागेचे समन्वक प्रमोद पांडे यांनी या माॅडेलची माहिती देऊन उमेद अंतर्गत बचत गटाच्या उपक्रमाची माहिती दिली. बाभळेश्वरच्या उपसरपंच अमृत मोकाशे यांनी आभार मानले.