शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत भटके कुत्रे सोडणार; वैतागलेल्या नगरकरांचा इशारा 

By अरुण वाघमोडे | Updated: July 3, 2024 18:41 IST

अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात ...

अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, मोठी माणसे जखमी झाली आहेत. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणेही कठीण झाले आहे. या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेच्या आवारात भटके कुत्रे आणून सोडले जातील, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला. याबाबत बुधवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, महिला शहराध्यक्ष नलिनी गायकवाड, फारूक रंगरेज, सुदाम भोसले, नामदेव पवार, आसाराम कावरे, आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले. मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडण्यात येतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. 

टॅग्स :dogकुत्रा