मेहेरप्रेमींचे २४ तास मौन!

By Admin | Updated: July 11, 2016 00:56 IST2016-07-11T00:39:25+5:302016-07-11T00:56:38+5:30

अहमदनगर : मेहेराबाद येथे रविवारी हजारो भाविकांनी मौन पाळून मेहेरबाबांना आदरांजली अर्पण केली़ अवतार मेहेरबाबांनी १० जुलै १९२५ पासून आपल्या मौन व्रताला प्रारंभ केला होता़

Maherpremi 24 hours silence! | मेहेरप्रेमींचे २४ तास मौन!

मेहेरप्रेमींचे २४ तास मौन!

अहमदनगर : मेहेराबाद येथे रविवारी हजारो भाविकांनी मौन पाळून मेहेरबाबांना आदरांजली अर्पण केली़ अवतार मेहेरबाबांनी १० जुलै १९२५ पासून आपल्या मौन व्रताला प्रारंभ केला होता़ पुढे ४४ वर्षे बाबांनी मौन ठेवले होते़ या दिवसाची आठवण म्हणून आज जगभरातील मेहेरप्रेमींनी मौन पाळले़ आरणगाव जवळील मेहेराबाद येथे भाविकांनी समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ येथील टेकडी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती़ भाविकांनी येथे २४ तास मौन पाळले़ भाविकांची गर्दी असूनही सर्वत्र शांतता पसरली होती़ समाधी दर्शनासाठी जिल्ह्यासह देशभरातील भाविकांनी हजेरी लावली होती़ रिमझिम पाऊस आणि मौनासाठी जमलेल्या भाविकांच्या मेळ््याने अरणगाव भक्तीमय झाले.

Web Title: Maherpremi 24 hours silence!