महायुतीपुढे मतविभाजनाचा धोका, आघाडीत शांतता!

By Admin | Updated: June 17, 2014 00:37 IST2014-06-17T00:05:54+5:302014-06-17T00:37:24+5:30

अशोक निमोणकर, जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटलेले नसतानाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपाला मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली.

Mahayuti before the division of divide, the silence of the front! | महायुतीपुढे मतविभाजनाचा धोका, आघाडीत शांतता!

महायुतीपुढे मतविभाजनाचा धोका, आघाडीत शांतता!

अशोक निमोणकर, जामखेड
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटलेले नसतानाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपाला मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली. ही आघाडी विधानसभेला कायम राहणार की काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मतदारसंघ खेचून आणण्यासाठी एखादा नवा फॉर्म्युला राबवणार याबाबत मतदारसंघात आतापासून उत्सुकता आहे.
१९९५ पासून भाजपा-सेना युतीने या मतदारसंघात सातत्याने विजय मिळवला. २००९ मध्ये २५ वर्षानंतर मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारासाठी खुला झाला. मागील विधानसभा निवडणुकीत आ.राम शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करीत कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेचे असलेले प्रा.मधुकर राळेभात यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. कर्जत येथील नामदेव राऊत यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात घेऊन पक्ष भक्कम केला होता. राऊत यांना योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल, असा शब्द स्व.मुंडे यांनी दिला होता. आता राऊत काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.मधुकर राळेभात यांनी मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. ते यावेळीही सक्रिय आहे. शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे निवडणुकीची तयारी वर्षभरापासून करीत आहे. हे सर्वजण युतीत असल्याने महायुतीला मत विभाजनाचा धोका आहे. मात्र याचा फायदा घेण्याची कोणतीही रणनिती काँग्रेस आघाडीकडे दिसत नाही. त्यामुळे युतीतील इच्छुकच काँग्रेसच्या तिकिटावर डोळा ठेवून आहेत.
काँग्रेस पक्षाने गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून कर्जतचा उमेदवार दिला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे तिकिटासाठी इच्छुक आहेत. तर कर्जतमधून राजेंद्र देशमुख, परमेश्वर पांडुळे, मिनाक्षी साळुंखे, प्रवीण घुले, अंबादास पिसाळ इच्छुक आहेत. जिल्हा परिषद सदस्य घुले यांनी मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून १८ हजार मते मिळवली होती. त्यातील ९० टक्के मतदान कर्जतमधील आहे. त्यामुळे कर्जतमधून काँग्रेसची अधिकृत उमेदवारी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये येथील जागा नाही परंतु या पक्षाचे दोन्ही तालुक्यात मोठे प्राबल्य आहे. जामखेडमधून तीन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे उपसभापतीपद तर कर्जतमधून तीन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती पक्षाच्या ताब्यात आहे. पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे जाळे मतदारसंघात मजबूत आहे. या जोरावरच गेल्या निवडणुकीत राजेंद्र फाळके अपक्ष लढले होते. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात हे इच्छुक आहेत. यापैकी जि.प. सदस्या संध्या राळेभात यांचे पती शहाजी राळेभात यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उडी घेण्याची तयारी चालवली आहे.
भाजपाराम शिंदे  ४२८४५
काँग्रेसकेशवराव देशमुख  ३२६७३
अपक्षमधुकर राळेभात  २८५०८
इच्छुकांचे नाव  पक्ष
राम शिंदे  भाजपा
अंकुश ढवळे  काँग्रेस
राजेंद्र फाळके  राष्ट्रवादी
मधुकर राळेभात शिवसेना
लोकसभा निवडणुकीत
दिलीप गांधी यांना ४१ हजारांचे मताधिक्य

Web Title: Mahayuti before the division of divide, the silence of the front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.