महायुतीच्या गांधी, लोखंडेंचा ‘महा’खर्च

By Admin | Updated: June 18, 2014 01:22 IST2014-06-18T00:19:51+5:302014-06-18T01:22:00+5:30

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांचा ‘महा’खर्च झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी ५७ लाख ५७ हजार ३३ रूपये तर सदाशिव लोखंडे यांनी ५५ लाख ५८ हजार ९४१ रूपये खर्च केले आहेत.

MahaYuthi Gandhi, 'Maha Kharcha' of Lokhande | महायुतीच्या गांधी, लोखंडेंचा ‘महा’खर्च

महायुतीच्या गांधी, लोखंडेंचा ‘महा’खर्च

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांचा ‘महा’खर्च झाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी ५७ लाख ५७ हजार ३३ रूपये तर सदाशिव लोखंडे यांनी ५५ लाख ५८ हजार ९४१ रूपये खर्च केले आहेत. प्रारंभी काँग्रेस आघाडीच्या नगरमधील राजीव राजळे व शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे यांनी खर्चात आघाडी घेतली होती. नंतर मात्र, हात आखडता घेतला. तरीही ते खर्चात खासदारांच्या मागेमागेच आहेत.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चार टप्प्यात खर्च सादर करण्याची अट निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानुसार प्रत्येक उमेदवार खर्च सादर करीत होते. तो निवडणूक निरीक्षकांनी तपासलाही होता. मात्र, एकूण खर्च सादर करण्याची मुदत १५ जून होती. शिवाजी डमाळे व काकडे वगळता सर्वांनी खर्च सादर केला होता. त्याची केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची तपासणी पूर्ण झाली.
उमेदवारांना निवडणूक आयोगाने ७० लाख रूपये खर्चाची मुभा दिली होती. प्रमुख पक्षाचे उमेदवारांनी सढळ हाताने खर्चही केला. मात्र, अपक्ष उमेदवार अनामत रकमेएवढाच खर्च करू शकले. नगरमध्ये पोपट फुले यांचा १५ हजार ९५० व पेत्रस गवारे यांचा १६ हजार २८ रूपये खर्च झाला. शिर्डीत सर्वात कमी गंगाधर वाघ यांनी २१ हजार १२४ खर्च केले.
उमेदवारनिहाय खर्च
नगर- दिलीप गांधी (भाजप) - ५७५७०३३, राजीव राजळे (राष्ट्रवादी) - ५०७७९४७, लक्ष्मण सोनाळे - ३६६७७, बी.जी. कोळसे - २०९३२४५, पेत्रस गवारे - १६०२८, विकास देशमुख - ३४९९९, श्रीधर दरेकर - १०९९३०, दीपाली सय्यद (आप)- ४५७३५९, पोपट फुले - १५९५०, अजय बारस्कर - ६०२७११, अनिल घनवट - ४९९६६०.
शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) - ५४९७८१४, बाळासाहेब बागूल - २५६२८, महेंद्र शिंदे - १४१४९१, गंगाधर वाघ - २११२४, नितीन उदमले (आप) - ५७५४७५, रवींद्र शेंडे - ७६३०५, सदाशिव लोखंडे - ५५५८९४१, संदीप घोलप - ७०३६७, विजय पवार - ५३५६८, रघुनाथ मकासरे - १०४९४६, पोपट सरोदे - ७०६५८, उद्धवराव गायकवाड - ३११६०, सयाजी खरात - २७३७५.

Web Title: MahaYuthi Gandhi, 'Maha Kharcha' of Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.