कोविड सेंटरमध्ये महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:00+5:302021-05-23T04:21:00+5:30
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले. गेले वर्षभर शास्त्रज्ञ, डॉक्टर, ...

कोविड सेंटरमध्ये महायज्ञ
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले. गेले वर्षभर शास्त्रज्ञ, डॉक्टर, शासकीय यंत्रणा आदी कोरोनाविरोधात लढा देत आहेत. डॉक्टर व वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नातून लाखो लोक कोरोनामुक्त झाले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना मुक्तीसाठी महायज्ञ करणे म्हणजे त्या सर्वांचेच श्रेय नाकारणे, त्यांच्या प्रति अविश्वास व्यक्त करणारे आहे. तसेच अशास्त्रीय, अवैज्ञानिक व अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी कृती आहे. कोणत्याही पदार्थाचे ज्वलनानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, हे वैज्ञानिक सत्य आहे.
कोरोना रुग्णांना प्राणवायू कमी पडतो. त्यांना जास्तीत जास्त प्राणवायूयुक्त वातावरण व हवेची गरज असताना कोविड सेंटरमध्ये महायज्ञ करून तेथील हवा दूषित करणे, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढवून कोरोना रुग्णांच्या जीविताला धोका पोहोचविण्याची ही कृती आहे. आम्ही प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा आदर करतो; परंतु त्या धार्मिक भावना जोपासणे, पालन करणे संबंधितांनी त्यांच्या घरी अथवा खासगी ठिकाणी करावे. कोविड सेंटरमध्ये अशा प्रकारची कृती करणे निषेधार्ह आहे. हा प्रकार कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणे आहेच, परंतु लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांना चुकीच्या दिशेने नेणे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव ॲड. रंजना गवांदे, सल्लागार बाबा अरगडे, अहमदनगर अध्यक्ष प्रमोद भारुळे, काशिनाथ गुंजाळ, ॲड. प्राची गवांदे यांची नावे आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव ॲड. गवांदे, सल्लागार बाबा अरगडे, अहमदनगर अध्यक्ष प्रमोद भारुळे, काशिनाथ गुंजाळ, ॲड. प्राची गवांदे यांची नावे आहेत.