महाविकास आघाडीचा ग्रामपंचायातींवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:15+5:302021-01-17T04:19:15+5:30
अकोले : काहीसे हवेत गेलेले गावपुढारी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे पुन्हा जमिनीवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास ...

महाविकास आघाडीचा ग्रामपंचायातींवर दावा
अकोले : काहीसे हवेत गेलेले गावपुढारी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे पुन्हा जमिनीवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने बिनविरोध केलेल्या १४ ग्रामपंचायती तर प्रत्यक्षात मतदान झालेल्या ३६ पैकी किमान ३० ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा केला आहे. या निवडणुकीत भाजपाने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या तालुक्यातील काही नेत्यांना पंधरा दिवस गाव सोडता आले नाही. भावकी व गावकीचा गुंता सोडवण्यात गुरफुटून राहावे लागले. महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते ठामपणे आघाडीचा दावा करत होते तर भाजपवाले सावध सर्वपक्षीय पॅनल असल्याचे सांगत पूर्वीच्या विकासकामांवर मताचे दान माघत होते. कुणाच्या खांद्यावर कोणत्या पक्ष -पार्टीचा झेंडा हे गावपुढाऱ्यांनी मतदान होईपर्यंत मोठ्या खुबीने मतदारांना कळू दिले नाही. आता ५६६ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले असून १८ जानेवारीला यंत्रातून मतांची आकडेवारी बाहेर येताच काही पुढाऱ्यांचे चेहेरे उजळतील ?
शहरानजीक कम्युनिष्ट विचारसरणीच्या संवेदनशील नवलेवाडी गावात केवळ ६० टक्के मतदान झाले. तर निवडणुकीच्या दिवशी सकाळीच दोन गटात राडा झालेल्या उंचखडक गावात ९३.२३ टक्के तर ढोकरी गावात ९२.७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची आकडेवारी सत्ता बदलाची चाहूल देत आहे. बहुतेक गावात पिचड विरुद्ध पिचड गटातच फाईट रंगली. काही ठिकाणी संमिश्र लढत होती. मेहेंदुरीत कोणता गट व पक्ष कुणा विरुद्ध लढला हे शेवटपर्यंत समजले नाही.
यावेळी मात्र गावागावातील मातब्बर पुढाऱ्यांची तरूणाईने चांगलीच दमछाक केली. दरम्यान बिनविरोध १५ पैकी निंब्रळ सोडता १४ व ३६ पैकी ३० गावात महाविकास आघाडीची सत्ता असेल, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.
...........
सरपंच आरक्षण जाहीर झाल्यावरच भाजपकडे किती ग्रामपंचायत आल्या हे सांगणे उचित ठरेल,
- सीताराम भांगरे, तालुकाध्यक्ष, भाजप
........
८१ टक्के मतदान
अकोले तालुक्यात ३६ गावात मतदान झाले.
एकूण मतदान ६५ हजार ९१३ असून ५३ हजार ६५५ मतदान झाले. एकूण ८१.४० टक्के मतदान झाले.