नरेंद्र मोदींच्या वतीने साई समाधीला महावस्त्र

By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-26T00:05:54+5:302014-05-26T00:25:22+5:30

शिर्डी: नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत असतील तेव्हा त्यांच्या वतीने शिर्डीत सार्इंच्या समाधी व मुर्तीला भरजरी महावस्त्र अपर्ण केलेले असेल.

Mahavastra on behalf of Narendra Modi on Sai Samadhi | नरेंद्र मोदींच्या वतीने साई समाधीला महावस्त्र

नरेंद्र मोदींच्या वतीने साई समाधीला महावस्त्र

शिर्डी: नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत असतील तेव्हा त्यांच्या वतीने शिर्डीत सार्इंच्या समाधी व मुर्तीला भरजरी महावस्त्र अपर्ण केलेले असेल. याशिवाय भाजपा कार्यकर्ते द्वारकामाई मंदिरासमोर लाडु वाटुन आनंद साजरा करणार आहेत़ पंतप्रधानपदाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशसेवा व्हावी, त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी, या करिता सार्इंचा आशीर्वाद मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षाचे शिर्डी येथील कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी मोदींच्या वतीने साईबाबांना गुलाबी रंगाची, काश्मिरी विणकाम केलेली शॉल अर्पण केली जाणार आहे. ही शॉल सोमवारी सायंकाळच्या धुपारतीला साईसमाधी व साईमूर्तीवर चढविण्यात येणार आहे़ मोदी जेव्हा दिल्लीत शपथ घेत असतील तेव्हा फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. भाविक व ग्रामस्थांना पाच हजार लाडुंचे वाटप करण्यात येणार आहे़ भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, घनश्याम दोडीया, दिलीप संकलेचा, बाबुराव पुरोहित ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कोते, नगरसेवक सुरेश आरणे, किरण बर्डे आदिंनी यासाठी पुढाकार घेतला आहे़ यावेळी परिसरारातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mahavastra on behalf of Narendra Modi on Sai Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.