गुरु शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:42+5:302021-03-10T04:22:42+5:30

कोपरगाव : शहरातील श्री कोपरगाव बेट देवस्थानच्या पुरातन परम सद्गुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव या ...

Mahashivaratri festival at Guru Shukracharya temple canceled | गुरु शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव रद्द

गुरु शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव रद्द

कोपरगाव : शहरातील श्री कोपरगाव बेट देवस्थानच्या पुरातन परम सद्गुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव या वर्षीही चांगल्या प्रकारे साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली होती, परंतु कोरोणा महामारीमुळे यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.११) महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये.

मात्र, भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये, यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातील लघुरुद्र हा सकाळी ६:३० ते ७:३० तर महारुद्र (पूजापाठ) रात्री ९:३० ते १२:३० या वेळेत फेसबुक लाइव्ह करणार आहोत. त्यामुळे भक्तांनी त्यावरून दर्शन घ्यावे, असे आव्हान मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे.

Web Title: Mahashivaratri festival at Guru Shukracharya temple canceled