शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मैदानात उतरवले नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:02 IST

भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत.

अहमदनगर: भाजप-सेना युतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत. अकोल्यात वैभव पिचड यांच्या विरोधात डॉ. किरण लहामटे यांना तर पारनेरमध्ये निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आपल्या ७७ उमेदवारांची याची बुधवारी रात्री जाहीर केली. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात डॉ. किरण लहामटे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, शेवगावमध्ये प्रताप ढाकणे, पारनेरमध्ये निलेश लंके, अहमदनगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुरी, श्रीगोंदा व नेवासा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 77 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पंढरपूर भारत भालके, श्रीवर्धनमधून खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, मुरबाड येथून प्रमोद हिंदुराव, कोरेगाव शशिकांत शिंदे, कल्याण पूर्व प्रकाश तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाणे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. 

या 77 जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना,भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप - सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस