थोरात यांच्या कर्तबगार नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:38+5:302021-02-08T04:18:38+5:30
आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा ...

थोरात यांच्या कर्तबगार नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान
आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, रामदास वाघ, अॅड. माधवराव कानवडे, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सचिन गुजर, करण ससाणे, उत्कर्षा रूपवते, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, नवनाथ अरगडे, अमित पंडित, निर्मला गुंजाळ, सुरेश थोरात आदींची उपस्थिती होती.
महसूल विभागाच्या वतीने झालेल्या ऐतिहासिक निर्णयांतर्गत पोटखराबा शेतकऱ्यांच्या नावे उतारे, गरजूंना रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. कोरोना संकटात उत्कृष्ट कामगिरी बजावणारा कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला.
अभंग म्हणाले, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराला आदर्श तत्त्वे दिली. हाच समृद्ध वारसा महसूलमंत्री थोरात यांनी जपला असून, कधीही पक्षीय राजकारण केले नाही. त्यांचे नेतृत्व हे समाजातील सर्व घटकांसाठी आहे. त्यांनी केलेली अविश्रांत काम शेती, सहकार शिक्षण, राजकारण आणि समाजकारणात प्रत्येक क्षेत्रात मापदंड ठरला आहे.
डॉ. तांबे म्हणाले, थोरात यांनी कधीही पक्षाकडे काही मागितले नाही. मात्र, संविधान आणि पक्षावर त्यांची असलेली मोठी निष्ठा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. थोरात यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला साथ दिली. अजय फटांगरे, संतोष हासे, गणपत सांगळे, निखिल पापडेजा, बेबी थोरात, अर्चना बालोडे, नवनाथ आंधळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.
( ०७ थोरात)