शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : जानकरांची कपबशी रिकामीच राहणार! ‘रासप’चा एकही उमेदवार नाही; पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:35 IST

जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली. 

- अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणाºया महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही़ अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कपबशी रिकामीच ठेवली.जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली. धनगर समाजासह बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाºया जानकरांची सर्वव्यापक ओळख निर्माण झाली़ जानकरांच्या पक्षाचा विस्तार पाहता २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने रासपला जवळ करत मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले़ वर्षभरापूर्वी जानकरांचे पक्ष स्थापनेपासूनचे सहकारी असलेल्या बाळासाहेब दोडतले यांना शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्षपद दिले़ सत्तेत सहभागी झालेल्या जानकरांचा आवाज मात्र गेल्या पाच वर्षात क्षीण झालेला दिसला़विधानसभा निवडणुकीत जानकरांनी रासपला प्रथमच ५७ जागा देण्याची भाजपाकडे मागणी केली. त्यानंतर १४ अन् शेवटच्या क्षणी दोन जागांवर समाधान मानले होते़ भाजपाने मात्र या दोन जागाही जानकरांच्या पदरात टाकल्या नाहीत.पक्षाच्या वाट्याला एकही जागा न आल्याने उद्विग्न झालेल्या जानकरांनी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि पक्षाने जिंंतूर मतदारसंघातून घोषित केलेल्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले़ ‘भाजपाने फसविले असले तरी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे सांगत जानकरांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाची अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी- रासपच्या महाराष्ट्रात शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापन झालेल्या असून, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे़ विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षालाही महायुतीकडून एकही जागा न मिळाल्याने ही अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारीलागली आहे़- सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला़ विधानसभा निवडणुकीत पक्षाला हक्काच्या जागा मिळणे अपेक्षित होते़ मात्र एकही जागा मिळाली नाही़ पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्यानुसार आमची पुढील वाटचाल राहणार असल्याचे रासपचे अहमदनगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी सांगितले़

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019