शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019;...मग झुणका भाकर अन् शिववडाचं काय झालं ते सांगा; कोल्हेंचा शिवसेनेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 11:03 IST

3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते.

अहमदनगर -  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोकांना 10 रुपयात सकस जेवण देऊ असं वचननाम्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. 10 रुपये थाळी देणार असं शिवसेना म्हणते मग 12 कोटी महाराष्ट्राचं विचारतो, झुणका भाकरचं काय झालं? शिववडा त्याचं काय झालं? तरीही म्हणत असतील तर गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? याची उत्तर द्या असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सांगितलं आहे. 

अहमदनगर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कोल्हे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,शिवसेनेच्या उमेदवारांना मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? 3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाडेतत्वावर देताना शिवसेना मूग गिळून गप्प बसणार असतील तर त्याचं उत्तर शिवसेनेने महाराष्ट्राला दिलं आहे. मग सांगा तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. 

तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून,मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 

महाराष्ट्राचं वातावरण फिरलंय, आता एकच लाट शरद पवार, हा महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, महिलांनी हे ठरवलं आहे. भाजपा-शिवसेना एक अजगर आहे, सर्व प्राण्यांना गिळंकृत करत चाललेला, एकदा फुस्स करायचं तर चौकशी, मोठा प्राणी दिसला की परत फुस्स सीबीआय अन् त्याहून मोठा प्राणी सापडला तर ईडी अशाप्रकारे हा अजगर महाराष्ट्राला विळखा घालण्याचा तयारी करतोय. मात्र या अजगाराचा बिमोड करण्याचं काम शरद पवारच करणार आहेत असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा