शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 06:48 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. थोरात समर्थकांवरही तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

संगमनेर : धांदरफळ बुद्रुक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या आंदोलन करून सुजय विखे यांच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. थोरात समर्थकांवरही तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

शुक्रवारी रात्री वसंत देशमुख यांनी जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या घटनेनंतर थोरात समर्थकांनी विखे समर्थकांच्या गाडीची तोडफोड करून वाहन पेटवले. विखे समर्थकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थोरात समर्थकांनी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मागण्यांचे निवेदन दिले.

जे काही घडले ते कुणालाही न शोभणारे, अत्यंत वाईट आहे. अशाने कोणती महिला राजकारणात येणार? मी असे काय केले की, माझ्याबद्दल एवढे वाईट बोलले? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असे बोलणे शोभते का?    - डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस

थोरात समर्थकांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून व जाळून दहशतीचे दर्शन राज्याला घडविले आहे. माझ्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. - सुजय विखे पाटील, माजी खासदार

वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप निषेध करत असून असे वक्तव्य खपवून घेणार नाही. पक्षातर्फे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलिस, महिला आयोगाने कडक कारवाई करावी. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप

- राज्य महिला आयोगानेही या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेतली आहे. याबाबत तातडीने चौकशी करुन  कारवाईचा अहवाल तत्काळ आयोगाकडे पाठवावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangamner-acसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSujay Vikheसुजय विखे