शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

महाजेनको परीक्षा पेपर फुटी प्रकरण; नगर केंद्रातून रिजवानने पाठविली अर्जुनला प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:10 IST

महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून इमेलद्वारे औरंगाबाद येथे अर्जुन घुसिंगे याला पाठविली होती.

अहमदनगर : महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून इमेलद्वारे औरंगाबाद येथे अर्जुन घुसिंगे याला पाठविली होती.औरंगाबादच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री नगर येथे येऊन रिजवान याचा शोध घेतला़ नगर शहरात मात्र तो सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या परसोडा या गावी जाऊन शोध घेतला तेव्हा त्याच्या घरात एक लॅपटॉप आढळून आला. पेपर फोडण्याच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार घुसिंगे हा फरार आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर नगर केंद्र्रासह इतर ठिकाणी त्याने बसविलेल्या उमेदवारांची माहिती समोर येणार आहे. सोमवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हारूण शेख यांच्यासह कॉन्स्टेबल अस्लम शेख, विजय चौधरी, कैलास काकड व प्रकाश सोनवणे यांनी नगर शहरात रिजवान याचा शोध घेतला.शासनाच्या महाजेनको कंपनीने लिपिकपदासाठी रविवारी (दि़१२) राज्यात विविध जिल्ह्यात आॅनलाईन परीक्षा घेतली़ नगर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. लिपिकपदासाठी अर्ज दाखल करणा-या उमेदवारांना या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण करण्याची जबाबदारी औरंगाबाद येथील अर्जुन घुसिंगे याने घेतली होती. यासाठी त्याने उमेदवारांकडून प्रत्येकी सात ते आठ लाख रुपयांचा सौदा केला होता. यातील ४० टक्के रक्कम अ‍ॅडव्हान्स तर उर्वरित रक्कम परीक्षेच्या निकालानंतर देणे, असा हा व्यवहार होता. घुसिंगे याच्या सांगण्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांनी अहमदनगर येथील परीक्षा केंद्र निवडले होते.

उमेदवारांच्या मनात शंका

महावितरण कंपनीच्या अंतर्गत असलेल्या महाजेनकोच्या लिपिकपदासाठी नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेत मात्र आॅनलाईन पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने अभ्यास करून परीक्षा देणा-या उमेदवारांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. सध्या जिल्हा बँकेच्या भरतीचे प्रकरण सुरू असतानाच महाजेनकोच्या परीक्षेचेही हे प्रकरण समोर आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार