अद्भूत जादुई प्रयोगांचा बच्चे कंपनीसाठी नजराणा

By Admin | Updated: September 26, 2014 00:16 IST2014-09-25T23:58:59+5:302014-09-26T00:16:48+5:30

अहमदनगर : जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादुच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Magnificent Magical Experiments Children look for the company | अद्भूत जादुई प्रयोगांचा बच्चे कंपनीसाठी नजराणा

अद्भूत जादुई प्रयोगांचा बच्चे कंपनीसाठी नजराणा

अहमदनगर : लोकमत बालविकास मंच आयोजित जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादुच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २७ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नंदनवन लॉन्स, हॉटेल पॅराडाईज जवळ, टिळक रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. पुणे येथील जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर हे हा कार्यक्रम सादर करणार असून ते मुलांसाठी पत्त्यांचे खेळ, मिस्ट्रीयस सिलिंडर फ्रॉम सिंगापूर, झिग-झॅगबॉय, डबल एक्स्चेंज मिस्ट्री, द फ्लार्इंग बॉक्स असे एक ना अनेक प्रयोग करून मुलांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमात नेत्रदीपक असा सेट, सुमधुर संगीत तसेच स्पेशल लाईटस असणार आहे. तसेच माणसाचे दोन तुकडे, प्रेक्षकातील मुलगी संपूर्ण अधांतरी, ट्युब झ्याक, मागाल तो पदार्थ मिळणार, नोटांचा पाऊस, प्रेक्षकांचा रूमाल हवेत नाच करतो, हवेत उडणाऱ्या बॉक्समधून माणसाची निर्मिती, जाड पत्र्यामधून माणूस आरपार, मानेतून तलवार आरपार अशा अनेक जादू बघण्याची संधी बालविकास मंचच्या सदस्यांना मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त बालविकास मंच सदस्यांसाठी असल्याने कार्यक्रमस्थळी ओळखपत्र आवश्यक आहे. सोबत फक्त एका पालकास प्रवेश देण्यात येईल.
लोकमत बालविकास मंचच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांद्वारे मुलांना मनोरंजन, प्रबोधन, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच धम्माल नाटक, विविध स्पर्धा, अभ्यास कसा करावा, संवाद कौशल्य अशा विविध विषयांवरदेखील कार्यक्रम आयोजित करून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बालविकास मंच सतत प्रयत्नशील असणार आहे.
जादुचे चित्तथरारक प्रयोग मुलांना आनंद देणार आहेतच तसेच येथे मुलांना जादुची पुस्तके विकत घेता येतील. जादुगार रघुवीर हे मुलांच्या हृदयाचे ठोके चुकतील असे भन्नाट प्रयोग सादर करणार आहेत.
अधिक माहितीसाठी लोकमत भवन, इव्हेंट विभाग, पत्रकार चौक, सावेडी रोड येथे संपर्क करावा.
(प्रतिनिधी)

Web Title: Magnificent Magical Experiments Children look for the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.