माेजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार मढीची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:43+5:302021-03-07T04:19:43+5:30

तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता.पाथर्डी) यात्रेतील सामूहिक भट्टीचा सण, रंगपंचमीची मानाची काठी, हुताशनी पौर्णिमेची मानाची होळी, फुलोरबागचा कावडी ...

Madhi Yatra will be held in the presence of my devotees | माेजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार मढीची यात्रा

माेजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार मढीची यात्रा

तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता.पाथर्डी) यात्रेतील सामूहिक भट्टीचा सण, रंगपंचमीची मानाची काठी, हुताशनी पौर्णिमेची मानाची होळी, फुलोरबागचा कावडी जलाभिषेक अशा विविध टप्प्यांतील धार्मिक विधी, सोहळे, पूजाविधी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार आहेत. पारंपरिक वाद्यांचा गजर, नृत्य फेर धरून होणाऱ्या काठ्यांच्या मिरवणुकांसह यात्रेतील विविध व्यावसायिकांना बंदी असेल, असा निर्णय बैठकीत झाला.

शनिवारी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली मढी येथे यात्रा नियोजन बैठक झाली. पशुहत्या, दारूबंदीची सक्त अंमलबजावणी व्हावी. आरोग्य विभागाने सर्वांगीण कर्तव्याचे पालन करावे. नियोजन बैठकीत होणाऱ्या निर्णयांची चर्चा केवळ त्या दिवसांपुरतीच न राहता कर्तव्य पार पाडताना ही याबाबी अधिकाऱ्यांच्या कृतीत असाव्यात, अशी अपेक्षा देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी व्यक्त केली.

बांधकाम, वितरण, आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडला. शरद कुटे, फिरोज शेख, नवनाथ मरकड, बबनराव ढवळे, अविनाश मंत्री यांनी अनेक मुद्यांकडे लक्ष वेधले.

देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे आदींनी बैठकीत उपस्थित झालेल्या तक्रारींना उत्तरे दिले. घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, गटविकास अधिकारी शीतल शिंदे, विश्वस्त अर्जुनराव शिरसाठ, विमल नवनाथ मरकड, रवींद्र आरोळे, डॉ. विलास मढीकर, राधाकिसन मरकड, भाऊसाहेब मरकड, श्यामराव मरकड, वितरण अभियंता हितेश ठाकूर, ग्रामसेवक श्याम साळवे आदी उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार यांनी आभार मानले.

---

यात्रौत्सवाचे विविध कार्यक्रम असे..

१४ मार्च रोजी भट्टी सणाने यात्रा आरंभ होते. मानाची काठी व होळी सण २८ मार्च, रंगपंचमी नाथांचा समाधी सोहळा २ एप्रिल, फुलोरबाग यात्रा १२ एप्रिल तर गुढीपाडवा महोत्सव १३ एप्रिल असा विविध टप्प्यात मढीचा यात्राैत्सव आहे.

Web Title: Madhi Yatra will be held in the presence of my devotees