मढेवडगाव सोसायटीने उतरविला सभासदांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:13+5:302021-08-02T04:09:13+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे होतेे. नागवडे म्हणाले, मढेवडगाव सोसायटीने सध्याच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये घेतलेला निर्णय ...

मढेवडगाव सोसायटीने उतरविला सभासदांचा विमा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे होतेे. नागवडे म्हणाले, मढेवडगाव सोसायटीने सध्याच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये घेतलेला निर्णय दिशादर्शक आहे.
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे म्हणाले, मढेवडगाव संस्थेने सहकारामध्ये वेगळा आदर्श उभा केला आहे. बाबासाहेब भोस म्हणाले, चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे सर्वांनी नेहमीच खंबीरपणे राहिले पाहिजे.
संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब वाबळे म्हणाले, मढेवडगाव सेवा संस्था ही फक्त कर्ज देणे- घेणे यापुरती मर्यादित नसून नेहमीच समाजोपयोगी कार्यांमध्ये पुढे राहते. हा पूर्वजांचा वारसा यापुढे असाच अखंड चालू ठेवून भविष्यामध्ये संस्थेची भव्यदिव्य इमारत उभारून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून वेगवेगळे शेती उपयोगी विभाग चालू करू, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुभाष शिंदे, विक्रमसिंह वाबळे, स्मितल वाबळे,
रावसाहेब जाधव, नंदिनी वाबळे, काकासाहेब मांडे, गोरख मांडे, खंडेश्वर झिटे, वर्षा वाबळे, सुरेखा शिंदे, पंडितराव वाबळे, भीमराव फरकांडे, ज्ञानदेव शिंदे, वसंतराव उंडे, संतोष गुंड, राहुल साळवे, योगेश मांडे, भाऊसाहेब मांडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब वाबळे यांनी आपला पाच वर्षांचा मीटिंग भत्ता व मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केले.