शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

उत्तर प्रदेशातील साईभक्तांची लखनऊ ते शिर्डी सायकल वारी; रोज करतात ४० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:22 IST

शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला.

रोहित टेके । कोपरगाव : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला. उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ जिल्ह्यातील शहाजापूर येथील अखिलेशकुमार मिश्रा, राजेश मिश्रा, राजेंद्र मिश्रा व अवदेश मिश्रा या चार साई भक्तांनी साईबाबांना नवस केला होता. तो पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यात (दि.१८) सप्टेंबर रोजी वरील चारही साईभक्त आपापल्या सायकलवर महिनाभर पुरेल एवढी शिदोरी तसेच कपडे व जीवनावश्यक वस्तुंचे गाठोडे टाकून शिर्डीच्या    दिशेने साईबाबांचे नामस्मरण करीत निघाले. दररोज सायकलवर ३५ ते ४० किमीचा प्रवास करून रस्त्यात येणा-या एखाद्या गावातील मंदिरात रात्री थांबून जेवण तयार करून खाल्यानंतर रात्री आराम करायचा. दुसºया दिवशी पुन्हा दैनंदिनी सुरु करायची. असा महिनाभराचा प्रवास सुरु होता. नवीन टायर टाकले प्रवासादरम्यान वरील चौघांच्या सायकलच्या टायरचे एक- एक जोड झिजला असून त्यांना पुन्हा नवीन टायर टाकावे लागले. मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील वारी येथून शिर्डीला जात असताना प्रवासादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र ग्रामस्थांनी त्यांना मदत केली. त्यानंतर ते शिर्डीच्या दिशेने रवाना झाले.

टॅग्स :saibabaसाईबाबाAhmednagarअहमदनगर