हिरडगावच्या सरपंचपदाची लाॅटरी सुनीता दरेकर यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:17+5:302021-09-04T04:26:17+5:30
अंबादास दरेकर गटाच्या सरपंच संगीता भालचंद्र दरेकर यांना ३ अपत्य असल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले. त्यावर संगीता दरेकर ...

हिरडगावच्या सरपंचपदाची लाॅटरी सुनीता दरेकर यांना
अंबादास दरेकर गटाच्या सरपंच संगीता भालचंद्र दरेकर यांना ३ अपत्य असल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले. त्यावर संगीता दरेकर यांनी आयुक्त नाशिक यांकडे अपील दाखल केले होते. दरम्यान औरंगाबाद हायकोर्टाने संगीता दरेकर यांना अपात्र ठरविले. त्यानंतर चिमाजी दरेकर, सुनीता दरेकर यांनी स्व. तुकाराम दरेकर गटात प्रवेश केला. त्यामुळे सरपंच निवडीत रंगत आली. सरपंच निवडीत सुनीता दरेकर, दीपाली दरेकर यांना प्रत्येकी समान ४ मते मिळाली. चिठ्ठीने सुनीता दरेकर यांना सरपंच पदाची लाॅटरी लागली. यावेळी अमोल दरेकर, संपत दरेकर, चिमाजी दरेकर सरपंच निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली. यावेळी झुंबर दरेकर, दादा बनकर, मिलिंद दरेकर, संतोष दरेकर, दत्तात्रय भुजबळ, बाळासाहेब दरेकर, संदीप दरेकर, विठ्ठल दरेकर, संपत दरेकर, पोपट ढवळे, रामदास दरेकर, परशुराम भुजबळ, दत्तात्रय दरेकर, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
.........
आमची भूमिका बजावली
स्व. प्रा. तुकाराम दरेकर यांचा विश्वासघात करून विरोधी गटाने सत्ता काबीज केली. अपात्र सदस्याला पात्र ठरवून सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने प्रशासनावर दबाव आणला. पण न्यायालयाने न्याय दिला. प्रा. तुकाराम दरेकर यांना कृतीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आमची भूमिका बजावली, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब नाहाटा व टिळक भोस यांनी दिली.