लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:59+5:302021-02-26T04:29:59+5:30

अहमदनगर : संपूर्ण फॅमिलीसाठी फॅशनेबल कपडे व आकर्षक ऑफर्समुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या नगर येथील सिलाई वर्ल्डच्या दालनात आता लग्नसराईनिमित्त ...

Lots of offers from Sewing World for wedding shopping! | लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

अहमदनगर : संपूर्ण फॅमिलीसाठी फॅशनेबल कपडे व आकर्षक ऑफर्समुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या नगर येथील सिलाई वर्ल्डच्या दालनात आता लग्नसराईनिमित्त विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. लग्नाच्या काळात सिलाई वर्ल्डने ‘लग्न करताय, डोकं लढवा’ ही ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये एका साडीच्या खरेदीवर महिलांना तब्बल चार पर्याय देण्यात आलेले आहेत. यामध्ये एका साडी खरेदीवर तब्बल ६० टक्के सवलत घ्या किंवा एक रुपयात दोन साड्या घ्या किंवा आणखी पाच साड्या फक्त रुपये २१०१ मध्ये देऊन खरेदी करा. अथवा यातील कुठलाच पर्याय न निवडता २५०० रुपयांचे अधिकची खरेदी करा. या खरेदीसाठी सिल्क, पैठणी, डिझायनर साड्यांसोबतच घागरा-गाऊन्सचेदेखील प्रकार आहेत. तसेच पुरुषांनादेखील ३१ टक्के ऑफर किंवा ६२ टक्के अधिकची खरेदी असा पर्याय देण्यात आलेला आहे. पुरुषांच्या निवडीसाठी इंडो, बंधगळा, ट्यूक्सेडो, ब्लेझर, कुर्त्याचे विविध प्रकार व फ्रेश स्टॉक देण्यात आले आहेत. या ऑफरसोबतच सिलाई वर्ल्डने ‘लव्ह डिल्स’ देखील दिलेल्या आहेत. यामध्ये पाच लेडीज कुर्तीज्‌ फक्त रुपये १३०१ मध्ये किंवा ५ वूमेन्स टॉप्स रुपये १०१० मध्ये देण्यात येत आहेत. ५ मेन्स शर्ट फक्त रुपये १४०१ मध्ये तर ५ बॉईज टी-शर्ट्‌स १३०१ मध्ये आणि ५ किड्स कॅज्युअल्स अवघ्या १३०१ रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. लग्नसमारंभासाठी खरेदी करताना थेट डिस्काउंट देण्यापेक्षा ग्राहकांना आकर्षक पर्याय निवडण्याची संधी द्यावी, याच हेतूने ही ऑफर देण्यात आली आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर सावेडी रोड, सर्जेपुरा, अहमदनगर येेथील शोरूममध्ये उपलब्ध आहे. (वा. प्र.)

Web Title: Lots of offers from Sewing World for wedding shopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.