मॉडेल रस्त्यावर झाडांची जागा हरवली
By Admin | Updated: May 31, 2016 23:07 IST2016-05-31T22:58:21+5:302016-05-31T23:07:31+5:30
अहमदनगर : बहुतांश शहरांत प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा झाडे बहरलेली पाहायला मिळतात़ रस्त्यांच्या बाजूला मोठी जागा सोडून त्यात वृक्षांची लागवड केली जाते़

मॉडेल रस्त्यावर झाडांची जागा हरवली
अहमदनगर : बहुतांश शहरांत प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा झाडे बहरलेली पाहायला मिळतात़ रस्त्यांच्या बाजूला मोठी जागा सोडून त्यात वृक्षांची लागवड केली जाते़ एकमेव नगर महापालिका मात्र त्यास अपवाद ठरली आहे़ अंतर्गत रस्ते तर अतिक्रमणांनी गिळले आहेत़ नगरमध्ये नव्याने तयार झालेल्या पाच मॉडेल रस्त्यांवर झाडे लावण्यासाठी जागाच सोडलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे झांडाशिवाय हे रस्ते मॉडेल कसे होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
केंद्र सरकारच्या वन महोत्सवाच्या माध्यमातून झाडे लावण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे़ पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी टाकलेले हे एक पाऊल आहे़ नगर जिल्ह्यातही अधिकाधिक झाडे लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे़ महापालिकेला पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट त्यांनी दिले आहे़ मात्र, ही झाडे महापालिका नेमकी लावणार कुठे? जगविणार कशी? हे न सुटणारे कोडे आहे़ शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. वाहने जाण्यासाठी कशीबशी जागा शोधावी लागते, तिथे झाडे लावणे अशक्य झाले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन बाय दोनचे खड्डे घेऊन त्यात झाडे लावता येतील, एवढी जागा अपेक्षित आहे़ (प्रतिनिधी)