लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:07+5:302021-05-26T04:22:07+5:30

तमाशासह लोककला क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या कांताबाई सातारकर यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे ...

Lost an ascetic personality in the field of folk art | लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले

लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले

तमाशासह लोककला क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या कांताबाई सातारकर यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. गेली पन्नास वर्षे या लोककलेच्या माध्यमातून कांताबाईंनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका गाजविल्या. त्यांच्या दमदार भूमिकांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. कांताबाई सातारकरसह रघुवीर खेडकर या तमाशाच्या माध्यमातून सुमारे २०० कलाकारांना त्यांनी सांभाळले. अलका, अनिता, रघुवीर, मंदा या चार मुला-मुलींनी आपल्या आईची परंपरा जोपासत सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संस्कृती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

-----------------

लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपल्या

गेली पन्नास वर्षे तमाशा या लोककलेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणाऱ्या कांताबाई सातारकर यांनी वगनाट्यातून अनेक पुरुषी भूमिकाही साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाने कायम सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संगमनेरकरांसाठी कायम भूषणावह राहिले. त्यांच्या निधनाने तमाशा व लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, या क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपल्या.

- डॉ. सुधीर तांबे, आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ

------------

लोककलावंतांची आई हरपली

कांताबाई सातारकर या संगमनेरकरांसाठी कायम भूषण होत्या. थोरात-तांबे या दोन्ही परिवारांचे त्यांच्या बरोबर कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कांताबाईंचा राज्य पातळीवर होणारा गौरव हा संगमनेरकरांचा गौरव होता. त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील अनेक कलावंतांची आई हरपली आहे.

- दुर्गा तांबे, नगराध्यक्ष, संगमनेर नगर परिषद

Web Title: Lost an ascetic personality in the field of folk art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.