फळबागांच्या नुकसानीचे अखेर अनुदान झाले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 16:53 IST2020-06-29T12:44:03+5:302020-06-29T16:53:03+5:30
ढवळगाव (जि. अहमदनगर) : सन २०१९ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये फळबागाचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यापासून शेतकरी वंचित होते. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर आता हे अनुदान जमा झाले आहे. तीन गावे मिळून ६५ लाभार्थी होते. त्यांना एकूण 10 लक्ष रुपये खात्यावरती जमा करण्यात आले.

फळबागांच्या नुकसानीचे अखेर अनुदान झाले जमा
ढवळगाव (जि. अहमदनगर) : सन २०१९ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये फळबागाचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यापासून शेतकरी वंचित होते. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर आता हे अनुदान जमा झाले आहे. तीन गावे मिळून ६५ लाभार्थी होते. त्यांना एकूण 10 लक्ष रुपये खात्यावरती जमा करण्यात आले.
अतिवृष्टीने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. शासन दरबारी त्याची दखल घेत फळबागेसाठी राज्यपालांनी हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. जवळपास सहा महिने झाले तरीही ढवळगाव, येवती, अरणगांव दुमाला येथील फळबाग शेतकरी यांना ही शासनाची मदत मिळाली नव्हती. तलाठ्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा करून शेतकºयांनी तुमचे अनुदान तुमचे खात्यावर जमा होतील, अशी ग्वाही देत होत्या लोकमतने दिंनाक २७मे रोजी बातमी प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे, अंबर शिंदे, भाऊसाहेब ढवळे, श्रीकांत लोंढे, भाऊ कुदळे, संजय ढवळे, नामदेव ढवळे, हेमंत गाडेकर आदी शेतकºयांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार यांना फोन करून फळबाग शेतकºयांचे अनुदान जमा करण्यास सुचना केल्या. त्यानंतर चार दिवसातच तहसिलदार यांनी शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले.