कांदा बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:19+5:302020-12-16T04:35:19+5:30
घारगाव : बोगस कांदा बियाणांमुळे श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तक्रार निवारण ...

कांदा बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
घारगाव : बोगस कांदा बियाणांमुळे श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तक्रार निवारण समितीने कांदा प्लॉटला भेट देऊन पाहणी केली आहे. त्याचा पंचनामा केला आहे.
घारगाव येथील तीन शेतकऱ्यांनी कमलजा कंपनीचे कांद्याचे पॅकिंग पुड्यातील कांद्याचे बियाणे ऑक्टोबर महिन्यात खरेदी केले होते. रोप तयार करण्यासाठी बियाणे वाफे तयार करून शेतात टाकण्यात आले. सदरील कंपनीच्या बियाणांची उगवण क्षमता कमी प्रमाणात झाली. घारगाव येथील शेतकरी पांडुरंग थिटे यांनी २७ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथील श्री साई समर्थ ऍग्रो एजन्सी या कृषी दुकानांमधून कमलजा कंपनीचे पॅकिंग पुड्यातील ७००० रुपये किमतीचे कांद्याचे बियाणे खरेदी केले होते. सदरील बियाणांची उगवण कमी प्रमाणात झाली. त्यामुळे पांडुरंग थिटे हे पूर्णपणे हतबल झाले आहेत. सदरील कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घारगावमधील तीनही शेतकऱ्यांनी केली आहे.
या कंपनीच्या बियाणे विक्रेताच्या परवान्यामध्ये सदरील कमलजा कंपनीच्या उगमश्रोताचा समावेश आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. परवानगी नसतानाही सदरील बोगस बियाणांची कृषी दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. आणखी कोणकोणत्या दुकानांमधून त्याची विक्री झाली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
...
प्लॉटचा केला पंचनामा
सदरील कंपनी विरोधात घारगाव येथील पांडुरंग थिटे यांच्यासह अन्य दोन शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली. सदरील तक्रार निवारण समितीने १४ डिसेंबर रोजी घारगाव येथील शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट दिली. त्याठिकाणी कांद्याच्या रोपाची उगवणक्षमता ३० ते ४० टक्के आढळून आली. सदरील समितीने प्लॉटचा पंचनामा केला.
...
कंपनीने अधिकारी नॉट रिचेबल
कमलजा कंपनीशी मोबाईलवरून संभाषण करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. कांदा रोपांची पाहणी करताना तक्रार निवारण समितीचे पंचायत समिती कृषी अधिकारी जे.पी .खोसे , कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के, राहुरी विद्यापीठाचे डॉ.व्ही .आर जोशी, मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते आदी उपस्थित होते.
...
फोटो-१५ घारगाव कांदा प्लॉट
....
ओळी-घारगाव येथील शेतकरी पांडुरंग थिटे यांच्या शेतातील उगवलेल्या कांदा रोपांची पाहणी करताना समितीचे पदाधिकारी.