शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत भुसार मालात शेतक-यांची होतेय लूट; क्विंटलमागे एक किलोचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:40 IST

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजूवर काटला व वाराईची रक्कम वजा केली जाते. या माध्यमातून शेतक-यांची लूट होत असून बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

रोहित टेके । 

कोपरगाव :  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजूवर काटला व वाराईची रक्कम वजा केली जाते. या माध्यमातून शेतक-यांची लूट होत असून बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

शेतक-यांना दिलेल्या अधिकृत पावतीतून अनधिकृत लुटीच्या अन्यायावर बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बाजार समिती नेमकी कुणाची ? असा प्रश्न या निमिताने शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे. 

 कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार, कांदा, भाजीपाला व डाळिंब या शेतमालाची खरेदी विक्री होते. भुसारासाठी १८, कांद्यासाठी २२, भाजीपाल्यासाठी ९ व डाळिंबासाठी ७ असे परवानाधारक व्यापारी आहेत. 

शेतमालाच्या लिलावानंतर वजन करण्यासाठी व्यापा-याच्या शेडमध्ये वजन काटे व बाजार समितीचा भुईकाटा आहे. माझ्या सोयाबीनची बाजार समितीच्या भुईकाट्यावर वजन करून व्यापा-याकडे पट्टी बनविण्यासाठी गेलो. भुईकाट्यानुसार माझी सोयाबीन १९.९१ क्विंटलची पावती बनविली. त्यात पावतीच्या मागील बाजूस १९.९१ किलो वजन कपात केली. मी विरोध केला. तसेच सभापती यांच्याशी संपर्क साधला. तरीही उपयोग झाला नाही. त्यानंतर वजन कपातीचे ७०७ रुपये व वाराईचे ८० रुपये एकूण ७८७ रुपये व्यापा-याने कमी दिले आहे. त्यामुळे शेतक-यांची व्यापा-यांकडून लूट होत असताना बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचा शेतक-यांसाठी काहीही उपयोग नाही. -राजेंद्र मलिक, शेतकरी

बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची वजन कपात केला जात नाही. कोणाची लेखी तक्रार आली तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.-परसराम सिनगर, सचिव, बाजार समिती, कोपरगाव.

शेतक-यांच्या भुसार मालाच्या वजनातून कोणत्याही प्रकारचा काटला काढला जात नाही. शेतक-यांना पट्टी दिली जाते. त्यात सर्व काही नमूद असते. - सुनीलकुमार कोठारी, भुसार मालाचे व्यापारी, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी