राजुरी येथील पेट्रोलपंपावर लूट : सव्वादोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 19:52 IST2019-01-24T19:52:07+5:302019-01-24T19:52:37+5:30

जामखेड खर्डा रोडवर राजुरी येथील ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

Looters at the petrol pump in Rajuri: Sawwadon Laxmik Lampas | राजुरी येथील पेट्रोलपंपावर लूट : सव्वादोन लाख लंपास

राजुरी येथील पेट्रोलपंपावर लूट : सव्वादोन लाख लंपास

जामखेड : जामखेड खर्डा रोडवर राजुरी येथील ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड खर्डा रोडवर दहा किलोमीटर अंतरावर राजुरी या ठिकाणी ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंप आहे. बुधवार (दि. २३) रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी पेट्रोल पंप कर्मचारी सचिन युवराज कोल्हे व त्यांचे मित्र सागर बुवासाहेब कोल्हे, दत्तात्रय शिवाजी डोंगरे हे त्यांची पेट्रोल पंपावर लावलेली मोटारसायकल घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती दारु पीत बसले होते. त्यावेळी दारु पीत असलेल्या आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना चाकूने मारहाण केली व जखमी केले. पेट्रोल पंपाच्या कॅबिनचा दरवाजा तोडून २ लाख १५ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी सचिन कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

Web Title: Looters at the petrol pump in Rajuri: Sawwadon Laxmik Lampas