लोणीव्यंकनाथ, बेलवंडीत कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:57+5:302021-04-21T04:21:57+5:30
बेलवंडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्यातून ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या ...

लोणीव्यंकनाथ, बेलवंडीत कोविड सेंटर
बेलवंडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्यातून ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, उपसरपंच उत्तमराव डाके, बेलवंडी सोसायटीचे उपाध्यक्ष स्वप्नील घोडेकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुभाष काळाणे, दिनेश इथापे, मधुकर शेलार, सोपान हिरवे, संदीप तरटे, प्रमोद क्षीरसागर आदी उपस्थित होते.
लोणी व्यंकनाथ येथील उद्घाटनप्रसंगी विलास काकडे, शिवाजी जाधव, मनेश जगताप, रामदास ठोंबरे, ज्ञानदेव मगर, लालासाहेब काकडे, सुनील पाटील, आशिष लडकत, गणेश काकडे, लियाकत तांबोळी, अविनाश पांढरे, राहुल गोरखे, डॉ. विनोद काकडे, नितीन शिंदे, डॉ. जायभाय आदी उपस्थित होते.
.................
मोफत रुग्णसेवा
लोणीव्यंकनाथ येथे बोलताना तहसीलदार पवार म्हणाले, बाळासाहेब नाहाटा यांच्या पुढाकारातून ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर झाले, याचा उपयोग रुग्णांना होणार आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले, लोणीव्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सात गावांतील कोरोना रुग्णांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
.................
२० श्रीगोंदा लोणीव्यंकनाथ
लोणीव्यंकनाथ येथे कोरोना सेंटरचे उद्घाटन करताना तहसीलदार प्रदीप पवार, डॉ. नितीन खामकर, बाळासाहेब नाहाटा आदी.
.............
२० श्रीगोंदा बेलवंडी
बेलवंडी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करतातना अण्णासाहेब शेलार. समवेत उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, उपसरपंच उत्तमराव डाके आदी.