‘माझी वसुंधरा’ पुरस्काराने लोणी बुद्रुक ग्राम पंचायतीचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:18+5:302021-06-06T04:16:18+5:30
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या ...

‘माझी वसुंधरा’ पुरस्काराने लोणी बुद्रुक ग्राम पंचायतीचा सन्मान
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचत्वावर आधारित पाच गटांत स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
लोणी बुद्रुक, ग्राम पंचायतीला माझी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, भाऊसाहेब विखे, प्रवीण विखे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयूर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर आदी उपस्थित होते.