लोणारी महिला मंडळाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST2021-02-23T04:31:36+5:302021-02-23T04:31:36+5:30

श्रीरामपूर : येथील लोणारी सखी मंच महिला मंडळाच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. येथील शिवपार्वती ...

Of the Lonari Women's Circle | लोणारी महिला मंडळाचा

लोणारी महिला मंडळाचा

श्रीरामपूर : येथील लोणारी सखी मंच महिला मंडळाच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. प्रारंभी सखी मंचच्या मुख्य प्रवर्तक कविता संवत्सरकर, रोहिणी कुऱ्हे, दीपा जऱ्हाड, उज्ज्वला आजगे, रेखा कुऱ्हे, पुष्पा कुऱ्हे, उज्ज्वला आजगे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, लोमेष ऋषी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमास मंगल जऱ्हाड, नीता जऱ्हाड, नयना जऱ्हाड, वंदना हरकल, संगीता इंगळे, लक्ष्मी संवत्सरकर, अलका आजगे, दीपा जऱ्हाड, रेणुका कुऱ्हे, उषा आजगे, शकुंतला आजगे, प्रमिला कुऱ्हे, संगीता इंगळे, शीला कुऱ्हे, सुनीता कुऱ्हे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी रेखा कुऱ्हे, पुष्पा कुऱ्हे, मंगल जऱ्हाड, ऊर्मिला जऱ्हाड, इंदूताई नरळे, उज्ज्वला आजगे, विमल कुऱ्हे, जया संवत्सरकर, सुनीता आजगे, पूजा ढोणे, रमिला कुऱ्हे, वंदना कुऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन रोहिणी कुऱ्हे यांनी केले. तर कविता संवत्सरकर यांनी आभार मानले.

Web Title: Of the Lonari Women's Circle