लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:05+5:302021-08-02T04:09:05+5:30

लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.०१) शहरात मातंग एकता आंदोलन संघटनेच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत ...

Lokshahir Anna will pursue Bhau Sathe to get Bharat Ratna | लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.०१) शहरात मातंग एकता आंदोलन संघटनेच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, नगरसेवक विश्वास मुर्तडक, निखिल पापडेजा, रजत अवसक, गौरव डोंगरे, गणेश मादास, विनोद साळवे, राजेंद्र जाधव, आंदोलनाचे शहराध्यक्ष राजेंद्र आव्हाड, उपशहराध्यक्ष नीलेश आल्हाट, संजय जमधडे, संदीप आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सागर राक्षे, दीपक आव्हाड, देवेंद्र साळवे, राजेंद्र राक्षे, गोरक्ष बलसाने, मनीष राक्षे, शिवाजी आव्हाड, सुनील पवार आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे मोठे योगदान होते. गिरणी कामगार, कष्टकरी यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याकरिता मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा यावेळी मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राक्षे यांनी केली.

Web Title: Lokshahir Anna will pursue Bhau Sathe to get Bharat Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.