लोकमत शिक्षक संदेश स्पर्धेतील विजेते जाहीर
By Admin | Updated: October 3, 2023 12:40 IST2014-09-09T23:14:58+5:302023-10-03T12:40:52+5:30
अहमदनगर : संदेश स्पर्धेचे सारिका कोठारी, निकिता शेलार, श्रेया शिरोडे विजेते ठरले आहेत.

लोकमत शिक्षक संदेश स्पर्धेतील विजेते जाहीर
अहमदनगर : ‘लोकमत’ च्या माध्यमातून गुरुजनांना (शिक्षकांना) शुभेच्छा देण्याच्या संदेश स्पर्धेचे सारिका कोठारी, निकिता शेलार, श्रेया शिरोडे विजेते ठरले आहेत. या विजेत्यांना प्रायोजक नम्रता गॅलरीतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील अन्य विजेते - प्रथम बक्षीस - सारिका रूपेश कोठारी (अहमदनगर), द्वितीय बक्षीस - निकीता भरत शेलार (सुरेगाव), तृतीय बक्षीस - श्रेया शिरोडे (कोपरगाव), उत्तेजनार्थ बक्षिसे (एकूण १५) - सरला विजयप्रकाश मालपाणी (अहमदनगर), गणेश कवडे (अहमदनगर), भाऊसाहेब सुकदेव थोरात (अहमदनगर), राज रवींद्र कवडे (अहमदनगर), वसंत रंगनाथ बडे (निंबे नांदुर), सुनील चंद्रशेखर धस (देवळाली प्रवरा), गौतम कुलकर्णी (अहमदनगर), पारधे व. र. (अहमदनगर), स्वप्नजा किशोर गाडगे, शेख मिराबक्ष खुदाबक्ष बागवान (वडाळा महादेव), पियुष रसिकलाल संचेती (सारोळा कासार), सुनील राऊत, शिला हेमंत कोठारी (अहमदनगर), फापाळे डी. एस. (निघोज), ऋत्विक संतोष ठुबे (अहमदनगर) या स्पर्धकांना बक्षिसे मिळणार आहेत.
संदेश स्पर्धेत विजयी स्पर्धकास प्रथम बक्षीस २००० रु. चे गिफ्ट व्हाऊचर, द्वितीय बक्षीस १००० रु. चे गिफ्ट व्हाऊचर, तृतीय बक्षीस रु. ५०० रु. चे गिफ्ट व्हाऊचर व १५ उत्तेजनार्थ १०० रु. चे गिफ्ट व्हाऊचर मिळणार आहे.
शिक्षक दिन विशेष संदेश स्पर्धेसाठी नम्रता गॅलरी नवीपेठ यांनी प्रायोजकत्व दिले होते.
सदर गिफ्ट व्हाऊचर लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड, अहमदनगर येथे जाहिरात विभागातून सकाळी ११ ते ४ या वेळेत मिळतील. विजेत्या स्पर्धकांनी गिफ्ट व्हाऊचर दोन दिवसात घेऊन जावे.
(प्रतिनिधी)