‘लोकमत अस्पायर’....नामवंत संस्थांचा सहभाग
By Admin | Updated: May 25, 2014 00:33 IST2014-05-24T23:52:30+5:302014-05-25T00:33:22+5:30
एज्युकेशन फेअर : ३० मेपासून प्रारंभ, एकाच छताखाली एकवटणार शिक्षणविश्व
‘लोकमत अस्पायर’....नामवंत संस्थांचा सहभाग
अहमदनगर : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्या ‘लोकमत समूहातर्फे’ दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘अस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ हा दर्जेदार शैक्षणिक उपक्रम (प्रदर्शन) दि. ३० मे ते १ जून २०१४ दरम्यान गायकवाड सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. आजवर विविध मान्यवर शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग निश्चित केला असून अद्यापही सहभागाची संधी आहे. जुन महिना जवळ येतो तसे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात पुढील शिक्षण आणि करिअरविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी ‘लोकमत’ने हा उपक्रम आयोजित केला आहे. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, येथपासून ते कोणते प्रोफेशनल कोर्स करावेत व कोणत्या कोर्समुळे भवितव्य उज्ज्वल होईल, दर्जेदार महाविद्यालय कोणते, अनुदान आहे की नाही, शुल्क किती आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘अस्पायर एज्युकेशन फेअर’या माध्यमातून मिळणार आहेत. महाविद्यालये, शाळा, ट्युशन आणि इतर क्लासेसचीही माहिती आता एकाच छताखाली मिळणार आहे. महाविद्यालये, शाळा, मेडिकल, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, कॉम्प्युटर संबंधित सर्व प्रकारचे कोर्स उपलब्ध करुन देणारे क्लासेस, अॅनिमेशन, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज असे व्होकेशनल शिक्षण देणारी कॉलेजेस याचबरोबर आयटीआय, पॉलिटेक्निक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट व्यावसायिकांना ‘अस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन लाखो विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. सहजरित्या अॅडमिशन कसे मिळेल या पालकांच्या प्रश्नाचे उत्तर या प्रदर्शनातून मिळणार आहे. ‘अस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन असून यात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर येथील ‘अस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ चे मुख्य प्रायोजक ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन’, टेलिव्हिजन पार्टनर ‘अहमदनगर सिटी चॅनेल तेलीखुंट, अ. नगर’, आऊटडोअर पार्टनर ‘चंगेडिया आऊटडोअर अॅडव्हर्टायजिंग’, फाऊंडेशन पार्टनर (डिपीईएस) पार्टनर ढोले पाटील एज्युकेशन सोयायटी व सुर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, पुणे हे आहेत. मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा. अधिक माहितीसाठी विजय (९९२२९१३१७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागी संस्था पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनस् कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, आयबीएमआरडी (एमसीए / एमबीए), कॉलेज आॅफ फार्मसी, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कॉलेज आॅफ नर्सिंग, इन्स्टिट्यूशन आॅफ नर्सिंग एज्युकेशन, कॉलेज आॅफ फिजीओथेरपी, आयटीआय, कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चर, इंग्लिश मिडीयम स्कूल, अॅग्रीकल्चर पॉलिटेक्निक, वाळुंज, छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेज, न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स, अ.नगर, स्रुजन अॅनिमेशन, पुणे, सुर्यदत्ता ग्रुप, पुणे, संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी, एमकेसीएल, अ.नगर, महाराष्टÑ स्कूल अॅण्ड कॉलेज, अ.नगर, विश्वभारती अॅकॅडमी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, सारोळाबद्दी, अ.नगर, न्यू लॉ कॉलेज, अ.नगर.