शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:52 IST

लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली.

ठळक मुद्दे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होत आहे.

शिर्डी - लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली.

शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस विरोधात टीकेची झोड उठवणारे राधाकृष्ण विखे यांच्यातील राजकीय संघर्ष येथे टोकाला पोहोचला आहे. थोरात यांनी कांबळे यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत अनेक नेत्यांची मोट बांधली आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांनीही  शिवसेना उमेदवार लोखंडे यांच्याकरिता अखेरच्या टप्प्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे पुत्र व नगरमधून भाजपकडून निवडणूक लढविलेले उमेदवार डॉ. सुजय विखे यांनीही श्रीरामपूर, संगमनेर, राहाता येथे सभा घेतल्या.

दरम्यान, सकाळी मतदानास सुरुवात होताच श्रीरामपूर शहरातील अनेक मतदान केंद्रावर यंत्रे बिघडल्याच्या तक्रारी पुढे आल्या. देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील माका, श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव, शहरातील बालिका विद्यालय, मॉडेल स्कुल येथे बिघाड झाले. मात्र ते तातडीने दुरुस्त करून देण्यात आले.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेऊन मतदान केले. त्यानंतर ते प्रत्येक तालुक्यातील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी निघाले आहेत. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहरातील नगरपालिका शाळेत मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाने दोनशे मीटरच्या आत वाहने लावण्यास व जमावाने फिरण्यास अटकाव केला आहे. राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधी यांना मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांकडूनही केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल काढून घेतले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीVotingमतदानPoliceपोलिसshirdi-pcशिर्डी