Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:33 IST2019-03-24T18:31:46+5:302019-03-24T18:33:34+5:30
डॉ.सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला आता चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसच्या प्रगतीमध्ये विखे कुटुंबाचा वारंवार अडथळा होता.

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका
अहमदनगर : डॉ.सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला आता चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसच्या प्रगतीमध्ये विखे कुटुंबाचा वारंवार अडथळा होता. काँग्रेसमध्ये राहून त्यांनी कायमच दुस-या पक्षाचे काम केले, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अहमदनगर येथे आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी आमदार सुधीर तांबे, राजेंद्र नागवडे यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.