Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून वंचित बहुजन आघाडीचे सुधाकार आव्हाड रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:59 IST2019-03-22T12:58:47+5:302019-03-22T12:59:57+5:30
वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नेवासा तालुक्यातील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून वंचित बहुजन आघाडीचे सुधाकार आव्हाड रिंगणात
अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नेवासा तालुक्यातील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून प्रा. किसन चव्हाण, डॉ. अरुण जाधव, सुधाकर आव्हाड, अशोक सोनवणे यांची नावे चर्चेत होती. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते इंद्रकुमार भिसे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली होती़ परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाड यांचे नाव जाहीर केले आहे. वंचित आघाडीचे नेते आंबेडकर यांनी मध्यंतरी नगर शहरात सभा घेऊन भाजपसह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांवर सडकून टीका केली होती़ जिल्ह्यातील घराणेशाही विरोधात सक्षम उमेदवार देण्याची घोषणा केली होती़ त्यामुळे या मतदारसंघातील चव्हाण जाधव आणि सोनवणे इच्छुक होते़ पण, ऐनवेळी उत्तरेतील आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली.