Lok Sabha Elecation 2019 : राधाकृष्ण विखे भाजपात आल्यास त्यांना मंत्री करू : आमदार शिवाजी कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:24 IST2019-03-27T19:22:09+5:302019-03-27T19:24:24+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला लोकसभेची उमेदवारी देऊन माझा पराभव केला. एखाद्याला राजकारणात पिछाडीवर न्यायचे असेल तर पवार अशी खेळी करतात.

Lok Sabha Elecation 2019 : राधाकृष्ण विखे भाजपात आल्यास त्यांना मंत्री करू : आमदार शिवाजी कर्डिले
राहुरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला लोकसभेची उमेदवारी देऊन माझा पराभव केला. एखाद्याला राजकारणात पिछाडीवर न्यायचे असेल तर पवार अशी खेळी करतात. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे धर्मसंकट नाही. मला माध्यमांनी किंगमेकर समजले आहे. आता हा किंगमेकरच सुजय विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आल्यास त्यांना आम्ही मंत्री करू, अशी आॅफर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज दिली.
राहुरी येथे भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी डॉ. सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, सहा महिन्यापूर्वी मी सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी केल्यास निवडून येण्याचे संकेत दिले होते. आज तसे घडले आहे. विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे जरी भाजपमध्ये आले तर त्यांनाही आम्ही मंत्री करू, अशी आॅफरही कर्डिले यांनी यावेळी दिली.