लोहसर होणार धूरमुक्त गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:22 IST2018-06-23T15:22:18+5:302018-06-23T15:22:22+5:30
चुलीच्या धुरापासून महिलांचे आरोग्य धोक्यात येते. धुरामुळे आरोग्यावर परिणाम होऊन महिलांचे आयुष्यमान घटते. धुरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

लोहसर होणार धूरमुक्त गाव
करंजी : चुलीच्या धुरापासून महिलांचे आरोग्य धोक्यात येते. धुरामुळे आरोग्यावर परिणाम होऊन महिलांचे आयुष्यमान घटते. धुरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. यामुळे लोहसर गावास चूल व धूरमुक्त करण्याचा मानस आहे. पुढील महिन्यात शासनाकडे रॉकेल नाकारणार आहोत. त्यामुळे लोहसर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील पहिले चूल व धूरमुक्त गाव ठरले आहे, असा दावा लोहसरचे सरपंच अनिल गिते यांनी केला.
लोहसर (ता. पाथर्डी) येथे वनविभागामार्फत आयोजित समतल चर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वन विभागाने हे गाव दत्तक घेतले आहे. या योजनेतंर्गत सलग समतल चर, सिमेंट बंधारे, सिसीटी, वनतलाव आदी कामांसाठी ४२ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या वनविभागाने हे गाव दत्तक घेतल्याने गावातील प्रत्येक कुटुंबास या महिन्यात गॅसचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.