शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:53 IST

महाराष्ट्र व संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी साईभक्तांच्या श्रद्धेचा आलेख मात्र खाली आलेला नाही. साईमंदिर बंद असूनही भाविकांकडून बाबांना देणग्यांचा ओघ सुरू आहे.गेल्या अठरा दिवसात साईसंस्थानला आॅनललाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक दान प्राप्त झाले आहे.

प्रमोद आहेर/शिर्डी : महाराष्ट्र व संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी साईभक्तांच्या श्रद्धेचा आलेख मात्र खाली आलेला नाही. साईमंदिर बंद असूनही भाविकांकडून बाबांना देणग्यांचा ओघ सुरू आहे.गेल्या अठरा दिवसात साईसंस्थानला आॅनललाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक दान प्राप्त झाले आहे.    कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजेनंतर साईमंदिर भाविकांना व ग्रामस्थांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिरात भाविकाविणा पूजा-अर्चा होत आहेत. १७ मार्च ते ३ एप्रिल या मंदिर बंदच्या काळात जगभरात विखुरलेल्या भाविकांनी साईबाबांना आॅनलाईनद्वारे १ कोटी २ लाख ३७ हजार रुपये दान पाठवले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.बंदच्या काळात भाविकांशिवाय साज-या झालेल्या गुढी पाडव्याला भाविकांनी याच माध्यमातून ५ लाख ३५ हजारांची देणगी पाठविली. विशेष म्हणजे देशभरात २२ मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊन करण्यात आले. या दिवशीही भाविकांनी आॅनलाईनद्वारे ३ लाख ६१ हजारांचे दान संस्थान तिजोरीत जमा केले. आर्थिक वर्षाखेर, ३१ मार्चला भाविकांनी सर्वाधिक १३ लाख १७ हजारांची देणगी दिली.    रामनवमीला लाखो भाविक पदयात्रेने शिर्डीला येतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनने भाविकांची निराशा झाली. शिर्डीला येणे शक्य झाले नाही तरी अनेकांनी साईबाबांना आॅनलाईन देणगी पाठवलेली दिसते. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात २३ लाखांहून अधिक रक्कम संस्थानला प्राप्त झाली असल्याचे संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी सांगितले. नव्वद वर्षापूर्वी समाधी मंदिर व द्वारकामाईत प्रत्येकी एक दक्षिणा पेटी होती. १९२९ चे पेटीचे वार्षिक उत्पन्न ६८७ रुपये होते. पूर्वी मंदिराच्या पेटीत संस्थानकडून रोज एक रूपयाची दक्षिणा टाकण्यात येत असे. हेच ३६५ रुपये पेटीत जमा होत. चार उत्सवातील दान पेट्यांचे उत्पन्न उत्सव व्यवस्थापकाकडे जात असे. या रकमा वजा केल्या तर दानपेटीत वर्षाकाठी अवघे तीनशे रुपये म्हणजे दिवसाकाठी रूपयाही पडत नसे. आज मंदिर बंद असतांनाही आॅनलाईनमुळे रोज साडेपाच लाखाहुन अधिक रक्कम देणगीत येत आहे. एरवी सरासरी रोज एक कोटींची दक्षिणा मिळते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर