नवनागापूरला चौदा दिवसाठी पुन्हा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:13 IST2020-07-18T11:46:01+5:302020-07-18T12:13:46+5:30
नगर शहराजवळील नवनागापूर येथे दोन दिवसात सात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा दुस-यांदा चौदा दिवस गाव बंद करण्याची वेळ आली आहे.

नवनागापूरला चौदा दिवसाठी पुन्हा लॉकडाऊन
निंबळक : नगर शहराजवळील नवनागापूर येथे दोन दिवसात सात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा दुस-यांदा चौदा दिवस गाव बंद करण्याची वेळ आली आहे.
नवनागापूर (ता.नगर) येथे कोरोनाची साखळी थांबायला तयार नाही. आतापर्यत सोळा नागरिंकाना कोरोनाची लागण झाली आहे. दहा रुग्ण अॅक्टीव्ह आहे.
नवनागापूर येथील जवळपास दोन हजार नागरिक नगर एमआयडीसीत कामाला आहे. नवनागापूर लॉकडाऊन केल्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांव्यतिरिक्त एकाही व्यक्तिला बाहेर जाता येणार नाही. लॉकडाऊन काळात कारखानदारानी कामगारावर कामाला येण्याची सक्ती केली तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ यानी दिली.