लॉकडाऊनचा लसीकरणाला अडथळा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:38+5:302021-04-08T04:21:38+5:30
(डमी) अहमदनगर : राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला अडथळा येईल, अशी शक्यता होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा लसीकरणामध्ये कोणताही ...

लॉकडाऊनचा लसीकरणाला अडथळा नाही
(डमी)
अहमदनगर : राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला अडथळा येईल, अशी शक्यता होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा लसीकरणामध्ये कोणताही अडथळा नसल्याचे नागरिकांसह प्रशासनाने सांगितले. दरम्यान, नगर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १२ हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी २ लाख ४८ हजार डोस संपले आहेत.
राज्यासह नगर जिल्ह्यात १६ जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर, त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिक अशा तीन टप्प्यांमध्ये आतापर्यंत लसीकरणाची मोहीम सुरू आहे. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाऊनच्या अनुषंगाने काही निर्बंध राज्यात लावले आहेत. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येऊन या मोहिमेला अडथळा येतो की काय, अशी स्थिती काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली. परंतु, नगर जिल्ह्यात आतापर्यंत तरी अशी उदाहरणे समोर आलेले नाहीत. लसीकरण केंद्रांपर्यंत जायला कोणतीही अडचण नाही, असे नागरिकांनी सांगितले, तर प्रशासनानेही लसीकरण मोहीम सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
नगर जिल्ह्याला आतापर्यंत ३ लाख ४१ हजार ८५० लसीचे डोस मिळाले असून त्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या डोसपोटी २ लाख २७ हजार नागरिकांना २ लाख ५४ हजार ५९ डोस देण्यात आले आहेत.
-------------
आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण (पहिला व दुसरा डोस मिळून)
हेल्थ केअर वर्कर - ४०८००
फ्रन्टलाइन वर्कर - १३२००
ज्येष्ठ नागरिक (४५ व ६० वर्षांपुढील) - १९९५००
----------------------
राज्य शासनाने कडक निर्बंध घातले असले तरी लसीकरणासाठी नागरिकांना कोणताही अडथळा येत नाही. लसीकरणासाठी पोलीसही नागरिकांना अडवत नाहीत. तसेच लसीचा पुरवठाही सुरळीत आहे. कोठेही तुटवडा नाही.
डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
----------------
लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी अडचण नाही, मात्र काही केंद्रांवर गेल्यावर बराच वेळ थांबावे लागते.
- आसाराम सोले, नागरिक
------------
लॉकडाऊनचा लसीकरणावर परिणाम जाणवत नाही. लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी पोलीस किंवा इतर कोणी अडवत नाही.
- भानुदास थोरे, नागरिक
------
डमी- नेट फोटो
टेस्ट कॉपी
कोरोना
०६ व्हू अहेड गन व्हॅक्सीन डमी