शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही अवैध वाळू उपसा सुरूच; ट्रॅक्टर चालक फरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:24 IST

संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे.

घारगाव : करोनाच्या पार्शभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असताना वाळू तस्करांकडून संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक मालक फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर, होमगार्ड मनोज थोरात हे बोटा शिवारात पेट्रोलिंग करीत असताना कच नदीच्या पुलावर आंबी दुमाला गावाकडे अवैध वाळू घेऊन जाताना ट्रॅक्टर मिळून आला. ट्रॅक्टर (एम.एच.-१७, बी.व्ही. ९४१३) व त्यास जोडलेली विनानंबरची ट्रॉली घारगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ताब्यात घेतली. पोलीस बघताच ट्रॅक्टर चालक, मालक पसार झाले. पोलीस नाईक संतोष विठ्ठल फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मुक्ताजी शिंदे व आत्माराम दशरथ नरवडे (रा.आंबीदुमाला, ता.संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारीsandवाळूriverनदी