अत्यवस्थ बिबट्याला मिळाले जीवदान

By Admin | Updated: July 13, 2016 00:28 IST2016-07-12T23:53:38+5:302016-07-13T00:28:05+5:30

अकोले : धामणगाव आवारी येथील तळेवाडी शिवारातील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात एक वर्षे वयाचा अत्यवस्थ बिबट्या आढळून आला.

Lives of a very leopard | अत्यवस्थ बिबट्याला मिळाले जीवदान

अत्यवस्थ बिबट्याला मिळाले जीवदान


अकोले : धामणगाव आवारी येथील तळेवाडी शिवारातील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात एक वर्षे वयाचा अत्यवस्थ बिबट्या आढळून आला. या बिबट्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने मोटारसायकल वरुन उपचारासाठी सुगाव रोपवाटिकेत नेले. वेळीच उपचार मिळाल्याने बिबट्याची प्रकृती सुधारत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे प्रभारी पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ. आर. डी. भांगरे यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी धामणगाव आवारी येथील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात बिबट्या आकळ्या घेत असताना शेतकऱ्यांना दिसला. त्यांनी तातडीने वन विभागाला कळवले. वनपरिक्षेत्रपाल आर. के. सगभोर यांच्या सूचनेवरुन आंबड विभागाचे वनरक्षक घोडसरे, वनमजूर दशरथ आवारी, शिवाजी दौंड खबर मिळताच हजर झाले. त्यांनी वेळ न दवडता स्थानिक युवकांच्या मदतीने सदर अत्यवस्थ बिबट्यास मोटरसायकलवरुन सुगाव रोपवाटिकेत हलवले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. भांगरे यांनी उपचार केले. सायंकाळपर्यंत बिबट्याचा ताप उतरला होता, मात्र बिबट्याचा धोका टळलेला नव्हाता.
पावसात भिजल्याने त्यास ताप आला असावा तसेच पोटात अन्न नसल्याने तो अत्यवस्थ झाला असावा, असे पशुधन अधिकारी यांनी स्पष्ट केले. डॉक्टर व वनपरिक्षेत्रपाल बिबट्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे, ते रोपवाटिकेत तळ ठोकून आहेत. सोशल मीडियावरुन स्थानिक युवकांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lives of a very leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.