जखमी बुलबुल पक्ष्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:16 IST2019-10-23T17:15:48+5:302019-10-23T17:16:15+5:30
भंडारदरा परिसरातील शेंडी-घाटघर रस्त्यावर मुरशेत येथील सम्राट सोनवणे या युवकाला एक छोटा बुलबुल पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या युवकाने त्या पक्ष्याला उचलून पाणी पाजून जीवदान दिले.

जखमी बुलबुल पक्ष्याला जीवदान
भंडारदरा : भंडारदरा परिसरातील शेंडी-घाटघर रस्त्यावर मुरशेत येथील सम्राट सोनवणे या युवकाला एक छोटा बुलबुल पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या युवकाने त्या पक्ष्याला उचलून पाणी पाजून जीवदान दिले.
सम्राट सोनवणे हा युवक पक्षी घेवून भंडारदरा येथील लोकमत प्रतिनिधी वसंत सोनवणे यांच्याकडे आला. सोनवणे यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क केला. तातडीने वनरक्षक बालिका फुंदे व दत्तू सदगीर हे हजर झाले. वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाºयांना बोलवून त्या पक्ष्यावर उपचार करण्यात आले. हा पक्षी बुलबुल जातीचा असल्याची माहिती वन कर्मचाºयांनी दिली.