पराभवाच्या चाहुलीने पक्षत्याग

By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T22:59:07+5:302014-08-24T23:08:23+5:30

पराभवाच्या चाहुलीने पक्षत्याग

Likely to defeat defeat | पराभवाच्या चाहुलीने पक्षत्याग

पराभवाच्या चाहुलीने पक्षत्याग

श्रीगोंदा : सत्तेच्या माध्यमातून जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी स्वत:चे खासगी उद्योग उभे केले़ आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाची चाहूल लागताच कर्जाच्या नावाखाली पक्ष सोडला़ अशा स्वार्थी आमदारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी जनतेच्या पाठबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, असे प्रतिपादन कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी केले़
राहुल जगताप समर्थकांनी श्रीगोंद्यातील शेख महंमद महाराज मैदानात परिवर्तन मेळावा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सभापती मीनाताई देवीकर होत्या़
पाचपुतेंनी झुलविले
जगताप म्हणाले की, पाचपुते यांनी ९ वर्षे मंत्रिपद भूषविले़ पाणी, माळढोक, साकळाई, नगर-दौंड रस्ता प्रश्नावर जनतेला झुलवत ठेवले आणि तालुका भकास केला़ माझ्यावर २१ व्या वर्षी कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली़ २३ व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो़ शेतकरी केंद्रबिंदू मानून जबाबदारीने काम केले आहे़ भविष्यात जनतेचा सेवेकरी म्हणून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
मान्यवरांची भाषणे
याप्रसंगी मीना देवीकर, विलासराव दिवटे, अनिल ठवाळ, दादाराम औटी, धनू दांडेकर, गंगाराम दरेकर, विरेंद्र सावंत, श्रीपाद ख्रिस्ती, जालिंदर जठार, हेमंत नलगे, बाळासाहेब उगले, शरद खोमणे, सचिन शिरसाठ यांची भाषणे झाली़ यावेळी संजय जामदार, डी़ एम़ कांबळे, तानाजी बोरुडे, सुखदेव तिखोले, भगवान गोरखे, प्रशांत दरेकर, राहुल सुपेकर आदी उपस्थित होते़ मेळाव्यास कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
‘राहुल’ चे तुम्हीच ठरवा
मला खाण्यासाठी भाकरी नव्हती़ कुकडी साखर कारखाना उभा केला़ कुणाशीही सत्तेसाठी सौदा केला नाही़ राहुल यांच्याकडे गाडी आहे़ साथीला तरुण सवंगडी आहे़ मी एक स्वप्न ठेवून लढत आहे़ परंतु आता शरीर साथ देत नाही़ एकुलता एक राहुल जनतेच्या ओटीत आज टाकत, माझे आजचे शेवटचे भाषण आहे. यापुढे राहुलचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे भावनिक आवाहन कुंडलिकराव जगताप यांनी केले़
सत्ता परिवर्तन हवे
आता विधानसभा लढवायची आहे़ मी कुणाच्याही झेंड्याखाली नाही़ परंतु पाणी प्रश्नासाठी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्याची तयारी आहे़ सत्ता परिवर्तन करण्यासाठी मागे हटणार नाही़ त्यासाठी तुम्ही बरोबर रहा, असे आवाहन करीत राहुल जगताप यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले़ यावेळी जगताप समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Web Title: Likely to defeat defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.