दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:10 IST2017-08-29T19:10:34+5:302017-08-29T19:10:34+5:30

अहमदनगर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे़ पाच दिवस ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभाग शास्त्रज्ञ डॉ़रविंद्र आंधळे यांनी सांगितले़

Light rain in moderate rainfall in two days | दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस

दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस

कमत न्यूज नेटवर्कराहुरी : राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने ३० आॅगष्ट ते ३ सप्टेबर यादरम्यानचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे़ अहमदनगर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे़ पाच दिवस ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभाग शास्त्रज्ञ डॉ़रविंद्र आंधळे यांनी सांगितले़येत्या पाच दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहणार आहे़ किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ वा-याचा ताशी वेग ८ ते २४ किलोमीटर राहणार आहे़ कमाल आर्द्रता ८८ ते ९१ टक्के राहील़ किमान आर्द्रता ५६ ते ७९ टक्के राहील, असा अंदाज विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे़कापूस,सोयाबीन, तूर, लिंबू, वांगी व भाजीपाला या पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे़ कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करावी, असे विद्यापीठाच्यावतीने सूचविण्यात आले आहे़

Web Title: Light rain in moderate rainfall in two days