एचआयव्ही संसर्गितांना मिळाला आयुष्याचा जोडीदार

By Admin | Updated: December 17, 2015 23:40 IST2015-12-17T23:32:14+5:302015-12-17T23:40:45+5:30

अहमदनगर : एचआयव्हीचा संसर्ग झाला म्हणून समाजाने नाकारलेल्या महिला व पुरुषांना स्रेहालयाच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार मिळाला़

Life partner for HIV infection | एचआयव्ही संसर्गितांना मिळाला आयुष्याचा जोडीदार

एचआयव्ही संसर्गितांना मिळाला आयुष्याचा जोडीदार

अहमदनगर : एचआयव्हीचा संसर्ग झाला म्हणून समाजाने नाकारलेल्या महिला व पुरुषांना स्रेहालयाच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार मिळाला़ बुधवारी एमआयडीसी येथील स्रेहालय संस्थेच्या प्रांगणात चार एचआयव्ही बाधीत जोडप्यांचा विवाह सोहळा थाटात साजरा झाला़ पुणे, बीड, परभणी व नगर येथील या चार जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला वधू-वरांचे आप्त उपस्थित नव्हते, परंतु स्रेहालय परिवार व ज्येष्ठ नागरिक संघाने ही कमी भरून काढली़
नगर व शेवगाव येथील देहविक्रय व्यवसायातील महिलांनी वधूंसाठी मणीमंगळसूत्र, भांडे, कपडे व इतर भेटवस्तू दिल्या़ तसेच शहरातील विविध व्यावसायिकांनी नवीन संसारासाठी अपेक्षित असणाऱ्या वस्तू यावेळी वधू-वरांना भेट म्हणून दिल्या़ यावेळी एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव म्हणाले, या विवाह सोहळ्यामुळे एड्स बाधितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळाला आहे़ सामाजिक विकासाला प्रेरणा देणारा हा एक क्रांतिकारक उपक्रम असल्याचे ते म्हणाले़
यापुढे दरवर्षी १५ डिसेंबर रोजीच अशा स्वरुपाचा विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे स्रेहालयाचे प्रवीण मुत्याल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Life partner for HIV infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.